विवाहित मुसलमानासमवेत पळून गेलेल्या विवाहित हिंदु शिक्षिकेला पोलिसांनी १ मासानंतर काढले शोधून !
रायचुरू (कर्नाटक) येथे ‘लव्ह जिहाद’ !
रायचुरू (कर्नाटक) – येथे सलीम नावाच्या विवाहित मुसलमान तरुणाने सुहासिनी या विवाहित शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सुहासिनी नंतर सलीमसमवेत घरातून पळून गेली. सलीम आणि सुहासिनी या दोघांनाही एकेक मूल आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आल्यानंतर जवळपास एक मासानंतर पोलिसांनी सुहासिनीला आंध्रप्रदेश येथील मंत्रालय येथून शोधून काढले. ‘सुहासिनीने ‘मी सलीमशी विवाह करणार’, असा हट्ट धरला होता’, असे सांगण्यात येते. ‘सलीमविरुद्ध तक्रार देऊनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही’, असा आरोप सुहासिनीच्या घरच्यांनी केला होता. (तक्रारीची नोंद न घेणारे पोलीस जनताद्रोहीच होत ! – संपादक)
हिंदु संघटनांनी सुहासिनीच्या घरी भेट दिली !
या प्रकरणाची माहिती मिळताच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शिक्षिकेच्या घरी जाऊन तिचे मनःपरिवर्तन करण्याचा, तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या सुवर्णा म्हणाल्या, ‘‘भ्रमणभाषमुळे, तसेच मैत्रीच्या नावाखाली हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते. हे कृत्य परिपूर्ण करण्यासाठी एक पथक बनवले जाते. महिलेच्या दुर्बलतेचा, कमकुवतपणाचा शोध घेतला जातो. ‘महिला आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या दुर्बल आहे का ?’, याचा शोध घेऊन त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते. याविषयी हिंदु मुलींनी सावध राहिले पाहिजे.’’
संपादकीय भूमिकाहिंदु महिलांना धर्मशिक्षण देण्याची किती आवश्यकता आहे, हेच अशा प्रकरणांतून दिसून येते ! |