खेर्डी ग्रामपंचायत कार्यालयात धर्मांधांनी लावले टिपू सुलतानचे छायाचित्र !
ग्रामस्थांचा विरोध होऊनही ग्रामपंचायत निष्क्रीय !
खेर्डी – येथील खेर्डी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मागील सप्ताहात कोणतीही पूर्वकल्पना न देता गावातील काही मुसलमान युवकांनी टिपू सुलतानचे छायाचित्र लावले. स्थानिक हिंदूंनी त्याला विरोध केला. कोणताही ठराव झालेला नसतांना अथवा शासनाचा असा कोणताही निर्णय आलेला नसतांना असे मनमानीपणे कुणीही शासकीय कार्यालयात छायाचित्र लावणे गुन्हा आहे, तसेच क्रूरकर्मा टिपूचे छायाचित्र लावण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असता ग्रामसेवक आणि सरपंच यांनी त्यावर कार्यवाही करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे ‘त्यांचेही या अवैध कृतीला समर्थन आहे कि काय ?’, असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. (शासनाच्या कार्यालयात असे अवैधपणे छायाचित्र लावणार्या उद्दाम धर्मांधांवर कारवाई करण्याचे सोडून त्याकडे दुर्लक्ष करणारे ग्रामपंचायत प्रशासन खरे दोषी आहे, असे निष्क्रीय प्रशासन जनतेला काय न्याय देणार ? – संपादक)