विवाह सोहळ्याकडे ‘समारंभ’ म्हणून नव्हे, तर ‘धार्मिक संस्कार’ म्हणून पहा !
‘आजकाल विवाह सोहळा हा एक मौजमजेचा कार्यक्रम असल्याचे हिंदूंना वाटते. त्यामुळे विवाहाचे विधी होत असतांना विवाहाला आलेली माणसे गप्पागोष्टी करत असतात, तसेच तेव्हा गाणी लावलेली असतात आणि अधूनमधून ‘बँड’ही वाजत असतो. या गोंगाटामुळे धार्मिक विधीमुळे निर्माण होणारी सात्त्विकता टिकून न रहाता घटते. हिंदु धर्मशास्त्रानुसार (धार्मिक पद्धतीने) विवाहविधी केल्यामुळे आणि मंत्रोच्चारांतील सुमधुर नादामुळे अष्टदिशा भारित होतात अन् चैतन्याच्या स्तरावर वधू-वरांना अशीर्वादात्मक बळ प्राप्त करून दिले जाते. हे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेल्या वैज्ञानिक चाचणीद्वारेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विवाह सोहळ्याकडे ‘एक मौजमजेचा कार्यक्रम’ म्हणून न पहाता ‘एक धार्मिक संस्कार’ म्हणून पाहिल्यास त्याचा वधु-वरांना, तसेच विवाहाला आलेल्या मंडळींनाही लाभ होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले