धार्मिक भेदभाव करणार्या ‘हलाल प्रमाणपत्रा’वर भारतात बंदी आणावी !
कराड येथे हलाल सक्ती विरोधी कृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी !
कराड, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – धर्माच्या आधारावर निर्मिलेली हलाल प्रमाणपत्र व्यवस्था अन्य समाजघटकांवर लादण्यात येत आहे. धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करण्यात येऊन ‘ज्या संस्था ‘हलाल प्रमाणपत्र’ देतात, त्यांची सीबीआयद्वारे चौकशी करून त्या निधीचा वापर आतंकवाद्यांना साहाय्य करण्यासाठी झाला आहे का ? याद्वारे राष्ट्रीय सुरक्षेला काही धोका नाही ना ? याचीही सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ‘हलाल सक्ती विरोधी कृती समिती, कराड’च्या वतीने येथील तहसीलदार कार्यालयातील अपर कारकून मकरंद साळुंखे यांना देण्यात आले.
या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे सातारा जिल्हा संघटक श्री. अजय पावसकर, गोरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष श्री. सुनील पावसकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कराड आणि पाटण तालुक्याचे कार्यवाहक श्री. सागर आमले, धारकरी श्री. चारुदत्त पाटील, श्री. उल्हास बेंद्रे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. संजय खेडेकर, शिवतेज संघटनेचे अध्यक्ष श्री. गणेश कापसे, कराड व्यापारी संघटनेचे सर्वश्री स्वागत शहा, नितेश मोटे, सुसाई गोरक्षण केंद्र सुर्ली, तालुका कराड येथील व्यवस्थापक श्री. ऋषिकेश गुरव, सनातन संस्थेचे श्री. चिंतामणी पारखे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अनिल कडणे, चेतन देसाई, बाबूराव पालेकर, मनोहर जाधव, अरुण जाधव उपस्थित होते.