हिंदु धर्माची महती समजण्यासाठी ‘कुंकू लावणे’ या विषयाशी संबंधित संशोधनासाठी काही विषय
१. भ्रूमध्याच्या बरोबर मागे मेंदूमध्ये ‘पिनियल’ आणि ‘पिट्यूटरी’ या ग्रंथी असतात. त्यांचा संप्रेरकांच्या (‘हॉर्माेन्स’च्या) नियंत्रणामध्ये अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. स्त्रियांच्या आरोग्यामध्ये संप्रेरकांचे संतुलन असणे पुष्कळ महत्त्वाचे असते. यासाठीही स्त्रियांना कुंकू लावण्यास सांगितले जाते का ?
२. सौभाग्यवतीच कुंकू लावतात. विधवा स्त्रिया कुंकू लावत नाहीत. स्त्रियांच्या प्रजननक्षमतेशी याचा काही संबंध आहे का ?
३. कुंकू हे हळद आणि चुना यांच्या मिश्रणातून बनते. धर्मशास्त्रात कुंकूच लावण्यास सांगितले आहे. केवळ हळद किंवा केवळ चुना नाही. असे का ?
४. दोन भुवयांच्या मध्ये जिथे कुंकू लावले जाते, तेथे आयुर्वेदानुसार ‘स्थपनी’ नावाचे मर्मस्थान असते. या मर्मस्थानाचे मेंदूच्या विकारांच्या दृष्टीने काही महत्त्व आहे का ?
५. योगशास्त्रामध्ये ‘भुवयांच्या मध्ये लक्ष एकाग्र करावे’, असे सांगितले आहे. भ्रूमध्याचे एवढे महत्त्व का आहे ?
६. आई बाळाला मांडीवर ठेवून थोपटतांना जिथे कपाळावर कुंकू लावले जाते, त्याच ठिकाणी हात ठेवते. असे केल्याने बाळही लगेच झोपी जाते. या स्थानाचा मेंदूतील झोपेच्या केंद्राशी काही संबंध आहे का ?
७. परीक्षाकेंद्रामध्ये प्रश्नांची उत्तरे लिहितांना उत्तर आठवत नसेल, तर विद्यार्थी नकळत भ्रूमध्याच्या ठिकाणी पेन टेकवतात. या स्थानाचा मेंदूतील स्मृतीकेंद्राशी काही संबंध आहे का ? कुंकू लावल्याने मेंदूतील ती ती केंद्रे जागृत रहातात, असे काही आहे का ?
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.११.२०२२)