परराष्ट्र मंत्रालयातील वाहनचालकाला अटक : ‘हनीट्रॅप’मध्ये अडकल्याचा संशय
पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचे प्रकरण
(‘हनीट्रॅप’ म्हणजे पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून इच्छित करून घेणे. अनेकदा राष्ट्रविरोधी कारवायांसाठी याचा उपयोग केला जातो.)
नवी देहली – पाकिस्तानातील एका व्यक्तीला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पुरवल्याच्या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयातील वाहनचालकाला देहली पोलिसांनी येथील जवाहरलाल नेहरू भवन येथून नुकतीच अटक केली. ज्या व्यक्तीला तो ही माहिती पुरवत होता, ती व्यक्ती त्याला पूनम शर्मा किंवा पूजा असल्याचे सांगून फसवत होती. यामागे पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय.’ या गुप्तचर संस्थेचा हात असल्याचे वृत्त आहे.
(सौजन्य : Zee News)
देहली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, हा वाहनचालक ‘हनीट्रॅप’मध्ये अडकला होता. वाहनचालक पैशांच्या बदल्यात पाकिस्तानमधील एका अधिकार्याला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे पाठवत होता.