…तर प्रत्येक शहरात आफताब जन्माला येतील ! : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे विधान
नवी देहली – श्रद्धा वालकर हिला मुंबईवरून आफताबने देहलीला आणले होते. तेथे तिची हत्या करून तिच्या शरिराचे ३५ टुकडे केले. तिचा मृतदेह शीतकपाटात ठेवून आफताब अन्य मुलींनाही घरी घेऊन येत होता. अशा घटना घडून नयेत, यासाठी देशाला सक्षम नेत्याची आवश्यकता आहे.
#WATCH | If today the country does not have a strong leader, a govt that respects nation as a mother, such Aftabs will emerge in every city and we will not be able to safeguard our society: Assam CM Himanta Biswa Sarma on Shraddha Murder Case (18.11.22) pic.twitter.com/HwZQn0BssF
— ANI (@ANI) November 19, 2022
जर देशाला सक्षम आणि सर्वांगीण विकास करणारा नेता मिळाला नाही, तर प्रत्येक शहरात आफताब जन्माला येतील. यामुळे देशाचे संरक्षण करणे अवघड होईल, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी गुजरातच्या कच्छमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी केले.
श्रद्धाच्या प्रकरणी तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी विरोधी पक्षाचे नेते गप्प का ? – खासदार साक्षी महाराज
श्रद्धाच्या प्रकरणात विरोधी पक्षातील लोक एवढे चिडीचूप का आहेत ? त्यांना काय साप चावला आहे का ?
(सौजन्य : TV9 Bharatvarsh)
तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, राहुल गांधी, ममता बॅनर्जी आदींपैकी कुणीही का बोलत नाही ?, असा प्रश्न भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी उपस्थित केला आहे.