ठाणे येथे राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
स्वातंत्र्ययवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेचे प्रकरण
ठाणे, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. याविरोधात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना डोंगरे यांनी तक्रार प्रविष्ट केल्यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमच्या महापुरुषांवर केलेली टीका सहन करणार नाही’, असा पवित्रा वंदना डोंगरे यांनी घेतला आहे.