हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण करणार्या मुसलमानाला अटक
धर्मांतर करून तिच्याशी केले लग्न !
बहराईच (उत्तरप्रदेश) – येथे महमूद खान या तरुणाने रौनक चौरसिया असे हिंदु नाव धारण करून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिचे लैंगिक शोषण करून तिचे अश्लील व्हिडिओ बनवले. (उत्तरप्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा असतांनाही अशा घटना थांबलेल्या नाहीत, हे पहाता आता अशा घटनांत धर्मांधांना फाशीची शिक्षा करण्याची तरतूद करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक) या तरुणीला महमूद खान याची खरी ओळख समजल्यावर तिने त्याला विरोध केला. त्यावर त्याने तिचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत तिचे धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर तो तिला मारहाण करत होता. शेवटी कंटाळून तिने पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांना महमूद याला अटक केली.