नराधम ‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर आणि स्वतंत्र कायदा करा ! – ‘रणरागिणी’ची मागणी
|
यावल (जिल्हा जळगाव) – श्रद्धा वालकर हिचे हत्या प्रकरण बघता हिंदु पालक आणि युवती कधी जाग्या होणार ? राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, तसेच या प्रकरणी लव्ह जिहादी आफताबला तात्काळ फासावर लटकवावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे करत आहोत, असे हिंदु जनजागृती समिती प्रणित ‘रणरागिणी’च्या कु. सायली पाटील यांनी म्हटले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि वरील मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’च्या वतीने यावल येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी कु. सायली पाटील बोलत होत्या.
‘राज्यात युवती आणि महिला बेपत्ता होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना, यामागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना, याचीही गृहविभागाने चौकशी करावी’, अशी मागणीही करण्यात आली. सर्व मागण्यांचे निवेदन यावल तहसीलदार महेश पवार यांना देण्यात आले. या वेळी डॉ. अभय रावते, पत्रकार सुधाकर धनगर, पत्रकार प्राची पाठक, भाजपचे भूषण फेगडे, हिंदु राष्ट्र सेना अध्यक्ष पियुष भोईटे, सांगवी येथील अधिवक्ता शरद कोळी, न्हावी येथील मयूर चौधरी आणि अनेक धर्मप्रेमी बांधव उपस्थित होते. या आंदोलनात विविध हिंदु संघटनांनी सहभाग घेतला. यावल तालुक्यातील विविध गावांतून धर्मप्रेमी बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.
‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, यासाठी समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची लवकरच भेट घेणार आहोत’, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
जळगाव येथे जिल्हाधिकार्यांकडेही निवेदनाद्वारे मागणी !वरील मागण्यांचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना देण्यात आले. या वेळी विश्व हिंदु परिषद, दुर्गा वाहिनी, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु राष्ट्र सेना आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या धर्मप्रेमी महिला उपस्थित होत्या. |