विश्व हिंदु परिषदेकडून अमरावती येथे निदर्शने !
श्रद्धा वालकर निर्घृण हत्या प्रकरण
अमरावती, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – देहलीत घडलेल्या श्रद्धा वालकर प्रकरणाचा निषेध करण्यासाठी, तसेच आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी राजकमल चौक येथे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला.
या वेळी विश्व हिंदु परिषदेचे विभाग मंत्री श्री. बंटी पारवानी म्हणाले, ‘‘या घटनेचा आम्ही निषेध करतो, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शासनाने आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी आणि जिहादी मानसिकता रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत.’’