नराधम ‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा ! – ‘रणरागिणी’ची आंदोलनाद्वारे मागणी
सांगली, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – वासनांध आणि नराधम ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला अन् सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’च्या वतीने मारुति मंदिर चौक, गावभाग येथे १७ नोव्हेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी ‘रणरागिणी शाखेच्या समन्वयक कु. प्रतिभा तावरे, सौ. विद्या सादुल यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनासाठी भाजप नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर, बजरंग दलाचे मिरज तालुका संयोजक श्री. आकाश जाधव, तालुका सहसंयोजक श्री. परशुराम नाईक, श्री. संदीप नाईक उपस्थित होते. या वेळी ‘आता अबला नको तू सबला हो, चंडी, दुर्गा, काली हो !’, ‘लव्ह जिहादी नराधम आफताबला फाशी द्या !’, ‘लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा !’ अशा घोषणा देण्यात आल्या. सूत्रसंचालन सौ. संपदा पाटणकर यांनी केले.
याच मागणीचे निवेदन १८ नोव्हेंबर या दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना देण्यात आले. या प्रसंगी रणरागिणीच्या शाखेच्या कु. प्रतिभा तावरे, कु. मृणाल धर्मे, हिंदुत्वनिष्ठ श्री. विठ्ठल मुगळखोड आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. गिरीश पुजारी उपस्थित होते.