नागपूर येथे हिंदु प्रेयसीच्या बहिणीवर २ धर्मांधांकडून ९ मास अत्याचार !
नागपूर – प्रेयसीच्या बहिणीला विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार करून २ धर्मांध पळून गेले. महंमद अरसलान अल्ताफ शेख (वय ३० वर्षे) आणि महंमद सर्फराज उपाख्य राजा खान अशी त्यांची नावे आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नागपूर येथील हिंदु तरुणीच्या बहिणीशी आरोपी महंमद अरसलान अल्ताफ शेख याचे प्रेमसंबंध होते. महंमद अरसलान याने एका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेयसीच्या बहिणीला घरी बोलावले आणि तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली; मात्र तिने नकार दिल्यावर त्याने बहिणीशी विवाह न करण्याची धमकी दिली. बहिणीचा विवाह तुटू नये; म्हणून ती शारीरिक संबंधास सिद्ध झाली. त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे अश्लील छायाचित्र अन् चित्रफीत सिद्ध केली. त्यानंतर तो वारंवार तिला बहिणीशी होणारा विवाह मोडण्याची धमकी देऊन अत्याचार करत असे. नंतर दोन्ही आरोपींनी त्या बहिणीवर बलात्कार करत तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफीत सिद्ध केली. समाजमाध्यमांवर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन गेल्या ९ मासांपासून तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी हिंदु तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. गुन्हे नोंद होताच दोघेही पसार झाले आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदु तरुणींनो, धर्मांधांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकायचे कि नाही, ते वेळीच ठरवा ! |