बेट द्वारका (गुजरात) येथील १०० अवैध मशिदींवर कारवाई !
द्वारका (गुजरात) – येथील बेट द्वारकेची लोकसंख्या १२ सहस्र ५०० इतकीच असली, तरी त्यात मुसलमानांची लोकसंख्या ८० टक्के आहे. म्हणजे ९ सहस्र ५०० मुसलमान येथे रहात आहेत. अवघ्या ६२ वर्षांत मुसलमानांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा अधिक झाली आहे. येथील भूमींवर अवैध बांधकाम करून तेथे मशिदी बांधण्यात आल्या आहेत. (एका छोट्याशा बेटावर मुसलमानांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा अधिक झाल्यावर काय होते, हे पहाता गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि संपूर्ण देश येथे त्यांची संख्या अधिक झाल्यास काय होईल ?, हे वेगळे सांगायला नको ! याच लोकसंख्या शास्त्राच्या आधारे भारताचे इस्लामीस्तान होण्यापूर्वी हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले पाहिजे ! – संपादक) मागील ऑक्टोरबर मासापासून येथील अवैध बांधकामांवर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत १०० हून अधिक अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. ४० टक्के कारवाई पूर्ण झाली आहे. उर्वरित कारवाई चालू आहे. बेट द्वारकेहून अवघ्या २ घंट्यांवर म्हणजे १०५ किलोमीटरवर पाकिस्तानचे कराची शहर आहे.
१. बेट द्वारका हा भाग मूळ द्वारकेपासून ३५ किलोमीटरवर आहे. बेट द्वारकेच्या चारही बाजूंनी समूद्र आहे. येथूनच अनेक मासेमार समुद्रातील आंतरराष्ट्रीय सीमेवर जातात आणि परत येतात.
२. वर्ष २००५ मध्ये बेट द्वारकेच्या किनार्यावर ६ मशिदी असल्याची नोंद होती; परंतु गेल्या १७ वर्षांमध्ये मशिदींची संख्या ७८ वर पोचली. आता त्यांच्यावर कारवाई चालू आहे. येथे जाण्यासाठी पत्रकारांना प्रशासनाची अनुमती घ्यावी लागते.
३. या बेटावरील मुसलमान त्यांच्या मुला-मुलींचे विवाह पाकमधील मुसलमानांशी करत आले आहेत. हा सर्व व्यवहार छुप्या पद्धतीनेच झाल्याची पोलीस प्रशासनाची माहिती आहे. या दृष्टीनेही अतीसंवेदनशील भाग म्हणून सध्या बेट द्वारकेकडे पहाण्यात येते.
४. बेटाच्या इतिहासानुसार येथे वर्ष १९४५ मध्ये गायकवाडी होती. म्हणजे बडोदा संस्थानचे राज्य होते. बडोद्याचे शासक गायकवाड यांनी मुसलमानांना येथे काही जागा उपलब्ध करून दिली होती. वर्ष १९६० च्या जनगणनेनुसार बेट द्वारकावर ६०० मुसलमान आणि २ सहस्र ७८६ हिंदु मतदार होते. लोकसंख्येच्या पातळीनुसार आणि काळानुसार इथली हिंदूंची संख्या ६ सहस्र, तर मुसलमानांची १ सहस्र २०० असायला हवी होती. प्रत्यक्षात मुसलमानांची लोकसंख्या ९ सहस्र ५०० आहे. तर हिंदु त्याहून अल्प आहेत.
संपादकीय भूमिकाबहुतांश मशिदींमध्ये देशविघातक कारवाया चालू असल्यामुळे देशभरातील प्रत्येक मशिदीची पडताळणी होणे आवश्यक ! |