भूमी जिहादचा बळी !
गेल्या ३० वर्षांपासून केरळच्या कासारगोड जिल्ह्यात दंतचिकित्सक म्हणून व्यवसाय करणारे डॉ. कृष्णमूर्ती सरपंगला (वय ५७ वर्षे) यांची इस्लामीवाद्यांनी हत्या केली. त्यांचा मृतदेह हत्तीयंगडी येथे रेल्वेरुळाजवळ सापडला. त्यांच्या पत्नीने ते बेपत्ता झाल्याप्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती. यानंतर शोध घेतांना वरील धक्कादायक वास्तव उघड झाले. त्यांची हत्या तर करण्यात आलीच; पण मृतदेहाचीही विटंबना केली होती. त्यांचे डोके छिन्नविछिन्न झाले होते. या हत्येप्रकरणी ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’चे कुंबदाजे पंचायत सचिव आणि सुपारी व्यापारी अली थुप्पकल्लू, बडियाडका पंचायत पदाधिकारी महंमद हनिफ येने अन्वर, कुंबदाजे रहिवासी अश्रफ, अन्नदका रहिवासी महंमद शियाबुद्दीन आणि विद्यागिरी मुनियुरू रहिवासी उमारुल फारूक यांना अटक करण्यात आली आहे. अली आणि अन्वर यांच्या नेतृत्वाखाली या आरोपींनी मिळून हे कृत्य केले. डॉ. कृष्णमूर्ती सरपंगला यांच्या हत्या प्रकरणाचे मूळ भूमी (‘लँड’) जिहाद हेच आहे. त्यांचा दंतचिकित्सकाचा व्यवसाय भरभराटीला आला होता. अर्थातच हे धर्मांधांना खुपले ! त्यामुळे मुस्लिम लीगचे काही नेते आणि इस्लामवादी यांनी त्यांना धमक्या देण्यास प्रारंभ केला. घटनेच्या आणखी मुळाशी गेल्यावर समजले की, त्याच शहरात त्यांच्या धर्माचे नवीन दंत रुग्णालय चालू करण्यात आले होते; परंतु डॉ. कृष्णमूर्ती हे त्या परिसरात अधिक प्रसिद्ध असल्याने नव्या दंत रुग्णालयाला तितकी प्रसिद्धी मिळत नव्हती. ‘डॉ. कृष्णमूर्ती यांनी त्यांचा व्यवसाय बंद केला असता, तरच रुग्णालयाची भरभराट होणार होती’, हे लक्षात आल्याने सर्वांनी डॉ. कृष्णमूर्ती यांना विरोध करण्यास प्रारंभ केला आणि शेवटी त्यांची हत्या केली. या सगळ्याचे मूळ अर्थात् कट्टर हिंदुद्वेष हेच आहे. या हिंदुद्वेषापोटी त्यांनी कृष्णमूर्ती यांना ‘चिकित्सालय बंद न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी गंभीर धमकी दिली. केवळ ते इतक्यावरच थांबले नाहीत, तर ३२ वर्षीय महिलेसमवेत लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोपही त्यांनी कृष्णमूर्ती यांच्यावर केला. ‘लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपामुळे स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी तरी ते त्यांचा व्यवसाय बंद करतील’, असा धर्मांधांचा मनसुबा होता. ‘स्वतःच्या धर्माच्या उत्कर्षासाठी धर्मांध वाटेल त्या थराला जाऊ शकतात’, हे हिंदूंनी या घटनेतून लक्षात घेऊन वेळीच शहाणे व्हायला हवे. गेली ३० वर्षे नामांकित वैद्य म्हणून व्यवसाय करणार्याला धमकावणार्या धर्मांधांचा उद्दामपणा यातून उघड होतो. आता डॉ. कृष्णमूर्ती नसल्याने तेथील दंत रुग्णालयाला कदाचित् प्रसिद्धी मिळेलही; पण यापुढे तेथील धर्मांधांचा उद्दामपणा वाढून ते हिंदूंचे आणखी व्यवसाय, धंदे लाटतील, हे निश्चित ! भारतातील अल्पसंख्य हे बहुसंख्य हिंदूंना धमकावतात, त्यांना स्थानिक ठिकाणाहून हद्दपार करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, हे भारतासाठी लाजिरवाणे ठरत आहे. यात प्रत्येक वेळी बळी जातो, तो हिंदूंचा ! ‘अशा वाढत्या घटना पहाता केंद्र सरकार कधी जागे होणार ?’, असाच प्रश्न पडतो.
काश्मिरी हिंदु विस्थापनाचा पुनर्प्रत्यय !
ज्याप्रमाणे काश्मिरी हिंदूंचे विस्थापन करण्यात आले, तशाच स्वरूपाच्या घटना आज देशात सर्वत्र घडत आहेत. डॉ. कृष्णमूर्ती यांचे उदाहरणही याचाच प्रत्यय देते. जे काश्मीरमध्ये वर्ष १९९० मध्ये घडले, तसे भारतातील अन्य राज्यांमध्ये घडण्यास वेळ लागणार नाही. त्याचीच आपण वाट पहात रहायची का ? आज जे केरळमध्ये घडले, त्यातून तेथील अन्य हिंदु आधुनिक वैद्य ‘आपल्यालाही आता येथून काढता पाय घ्यावा लागेल कि काय ? तसे न केल्यास आपल्यालाही डॉ. कृष्णमूर्ती यांच्याप्रमाणे जिहाद्यांचे लक्ष्य व्हावे लागेल’, या विचाराने भयभीत झाले असतील. आणखी किती काळ हिंदूंनी धर्मांधांच्या भूमी जिहादला बळी पडायचे आहे ? आता तर ‘वक्फ बोर्डा’नेही त्यात उडी घेतली आहे. त्यामुळे हिंदूंच्या भूमीवर अधिकार आणि वर्चस्व गाजवत धर्मांध मोठ्या प्रमाणात भूमी बळकावत आहेत. हे भारतियांसाठी धोकादायक नव्हे का ? पण लक्षात कोण घेतो ? ‘मी आणि माझे कुटुंब’ या संकुचित मानसिकतेत निद्रिस्त असणारे हिंदूच देशाच्या अशा परिस्थितीला कारणीभूत आहेत. ३० वर्षे एखाद्या ठिकाणी दंतचिकित्सक म्हणून व्यवसाय करणार्या वैद्यांना स्थानिक हिंदूंनीही पाठिंबा दिला नाही. ‘हिंदूंचेच संघटन कुचकामी ठरत असल्याचा अपलाभ धर्मांधांनी घेतला’, असे यात म्हणता येईल. महाराष्ट्रात कोणे एकेकाळी मराठी माणूस सर्व व्यवहार आणि व्यवसाय करत असे. आता त्याची जागा परप्रांतियांनी तर घेतली आहेच; पण त्यातही अधिक प्रमाण हे मुसलमानांचेच आहे. प्रत्येकी १० दुकानांच्या भाऊगर्दीत किमान ७ ते ८ दुकाने ही मुसलमानांचीच असतात, हे उघड सत्य हिंदूंनाही ठाऊक असेल. हे प्रमाण आता वाढतच जाणार आहे. ‘भारताला इस्लामीस्तान होऊ द्यायचे कि नाही ?’, हे सर्वस्वी हिंदूंवरच अवलंबून आहे. केरळमधील भूमी जिहादात डॉ. कृष्णमूर्ती यांचा बळी गेला. आणखी किती बळी जातील, याचा नेम नाही. हिंदू आता जर जागृत झाले नाहीत, तर वेळ निघून गेलेली असेल !
एरव्ही अल्पसंख्यांकांविषयी जरा कुठे खुट्ट झाले की, लगेच तथाकथित अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले, मानवाधिकारवाले, पुरो(अधो)गामी गळा काढतात आणि खापर मात्र हिंदूंवर फोडून मोकळे होतात. आता डॉ. कृष्णमूर्ती यांच्या बाजूने उभे रहायला यातील मंडळी आली तरी का ? कुणीही नाही. हिंदूबहुल देशात हिंदूंना कुणीही वाली नाही, हेच खरे ! हिंदूंची अशी नृशंस हत्याकांडे घडू नयेत, यासाठी पोलीस आणि सरकार यांनी ठोस पावले उचलायला हवीत.
भूमी जिहादला अटकाव करा !
हिंदूंनो, हा जिहादरूपी राक्षस तुमचे खच्चीकरण करत आहे, तुमच्यावर दबाव टाकत आहे आणि तुम्हाला संपवण्याचे मोठे षड्यंत्रही रचत आहे. त्याविरोधात लढण्यासाठी आपल्याला संघटित व्हावेच लागणार आहे. डॉ. कृष्णमूर्ती यांच्या मारेकर्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी वैध मार्गाने पावले उचला. तसे झाल्यासच तेथील वाढत्या भूमी जिहादला अटकाव बसेल.
हिंदूंनो, भारताला इस्लामीस्तान होऊ द्यायचे कि नाही, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे ! |