चंद्रग्रहणापासून घरात सतत आग लागत असल्याने उत्तराखंडमधील कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण
|
हल्दवानी (उत्तराखंड) – नुकत्याच झालेल्या चंद्रग्रहणानंतर येथील महानगरपालिकेजवळ रहाणार्या कमल पांडे यांच्या घरात आग लागत असल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे त्यांच्या कुटुंबियामध्ये भीतीचे वातावरण आहे. पांडे यांच्या घरात गेल्या आठवडाभरापासून घरात कुठेही आणि केव्हाही अचानक आग लागते. कधी घराच्या बंद कपाटात आग लागते, तर कधी ज्या पलंगावर व्यक्ती झोपलेली असते त्यातून धूर निघू लागतो, तर कधी वाळत टाकलेल्या कपड्यांना आग लागते. आगीच्या या घटनांमुळे या कुटुंबातील सर्वांना रात्री एकत्रित झोपावे लागत असल्याची परिस्थिती आहे.
घरातील संपूर्ण विद्युत वायरिंग पालटूनही उपयोग नाही !
आरंभी पांडे कुटुंबीयांना वाटले की, ‘अर्थिंग’मुळे घराला आग लागत असावी. त्यामुळे वीज विभागाने त्यांच्या घरात अर्थिंगचे काम केले. जुनी वीजजोडणीही तोडली. यासह त्यांच्या घरातील संपूर्ण विद्युत ‘वायरिंग’ही पालटले; मात्र तरीही अचानक आग लागण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.
वीजजोडणी नसलेल्या कूलरलाही अचनाक लागली आग ! – कमल पांडे
याविषयी कमल पांडे यांचे पती चंद्रा पांडे यांनी सांगितले की, वीजजोडणी नसलेल्या कूलरलाही आग लागली आहे. याससह बंद कपाटालासुद्ध अचानक आग लागली आहे. गेल्या आठवडाभरात आमच्या घरात एका पाठोपाठ एक अशी ११ वेळा आग लागली. आम्ही गेल्या ७० वर्षांपासून या घरात रहात आहेत; परंतु आजपर्यंत कधी अशी घटना घडलेली नाही. ‘हे काय चालू आहे ?’, हे आमच्यापैकी कुणालाच काही कळत नाही. या सर्व प्रकारामुळे या कुटुंबाला शेजारीच भाड्याच्या घरात रहावे लागत आहे. हे सर्व पाहून शेजार्यांनाही आश्चर्य वाटत आहे.
चंद्रग्रहणापासू सातत्याने घडत आहेत घटना ! – दीप्ती त्रिपाठी
कमल पांडे यांची मुलगी दीप्ती त्रिपाठी म्हणाल्या की, चंद्रग्रहणाच्या दिवसापासून हा प्रकार सातत्याने घडत आहे. कुटुंबातील सदस्य एका खोलीत आग विझवायला जातात, अशा वेळी दुसर्या खोलीत आग लागते.
कालव्याचे खोदकाम सुरू झाल्यापासून घराला आग लागण्याचे प्रकार ! – पांडे कुटुंबीय
पांडे कुटुंबातील सदस्यांना असे वाटते की, त्यांच्या घराजवळून एक कालवा जात आहे. त्यावर झाकण टाकण्याच्या कामासाठी काम काही दिवसांपासून कालव्याचे खोदकाम करण्यात आले. हे खोदकाम चालू झाल्यापासून घराला आग लागण्याचे प्रकार चालू आहेत.
शहर दंडाधिकार्यांकडून पोलीस चौकशीचा आदेश !
गूढरित्या आग लागल्याची माहिती मिळताच हल्द्वानीचे शहर दंडाधिकारी रिचा सिंह घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी पोलिसांना या प्रकरणी चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
संपादकीय भूमिका
|