गेल्या ५ दिवसांत आफताबच्या इन्स्टाग्राम खात्याचे सहस्रो धर्मांध मुसलमान झाले समर्थक !
श्रद्धा वालकर हिच्या हत्येचे प्रकरण• धर्मांध मुसलमानांमध्ये पाकिस्तान्यांचाही समावेश !• इन्स्टाग्रामवर अत्यंत अश्लाघ्य संदेश लिहून श्रद्धाची अपकीर्ती, तर आफताबचे कौतुक ! |
नवी देहली – आफताब अमीन पूनावाला याने त्याची प्रेयसी श्रद्धा वालकर हिची गळा दाबून हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते शीतकपाटात ठेवले. नंतर हे तुकडे त्याने प्रतिदिन थोडे थोडे नेऊन जंगलात फेकले. ही घटना उघड झाल्यापासून देशात संतापाची लाट उसळली आहे; मात्र दुसरीकडे आफताब याच्या इन्स्टाग्राम खात्याचे गेल्या ५ दिवसांत सहस्रो लोक फॉलोअर्स (समर्थक) झाले आहेत. त्यांनी या खात्याला भेट देऊन आफताबच्या समर्थनार्थ संदेश लिहिले आहेत. संदेश प्रसारित करणारे सर्व धर्मांध मुसलमान आहेत, असेच दिसून येत आहे. यात पाकिस्तानी मुसलमान असल्याचेही लक्षात आले आहे.
या संदेशात ते श्रद्धाच्या मृत्यूची थट्टा करत आहेत. ‘जी आई-वडिलांची होऊ शकली नाही, ती माझी कशी होईल’ अशा प्रकारचे संदेश लिहिले जात आहेत. अनेक संदेश अत्यंत अश्लाघ्य आहेत.
Social media users, especially from Pakistan, mock Shraddha Walkar's gruesome murder by 28-yr-old Aftab Amin Poonawalla https://t.co/iA3KUkJxMj
— OpIndia.com (@OpIndia_com) November 16, 2022
धर्मांध मुसलमानांनी लिहिलेले काही संतापजनक संदेश –
१. आमाद बट्ट याने मुसलमान मुलगा आणि हिंदु मुलगी असणारे एक छायाचित्र पोस्ट करत लिहिले आहे की, ही मुलगी जाड दिसत आहे. नंतर हिला खाता येऊ शकते.
२. फैजान चौधरी याने आफताब काहीतरी खात असतांनाचे छायाचित्र पोस्ट करत ‘श्रद्धा बीफ बर्गर’ असे नाव दिले आहे.
३. सैयदा फातिमा हिने ‘आफताब पूनावाला फ्रिज पोस्टिंग’ नावाचा फेसबुक गट बनवला आहे. यात ४०० सदस्य आहेत. ती आफताबला ‘हिरो’ ठरवत आहे. तसेच ‘लव्ह जिहाद’चा हॅशटॅग (एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे) बनवले आहे.
४. शयन खान याने एक पोस्ट शेअर केली आहे. यात म्हटले आहे की, ये तुला (मुलीला) शीतकपाटाच्या थंडीत घेऊन जातो.
संपादकीय भूमिका
|