भिवंडीतील शैक्षणिक संस्थाचालकाला ठार मारण्याची धमकी देणार्या दोघांना अटक !
महाराष्ट्रातील वाढते अराजक !
ठाणे, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – भिवंडी येथील शाळेत केलेल्या अनधिकृत बांधकामाची महानगरपालिकेत तक्रार करण्याची, तसेच ठार मारण्याची धमकी देत एका शैक्षणिक संस्थाचालकाकडून १ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. या प्रकरणी दिलीप साठे उपाख्य दिलीप पाटील (वय २९ वर्षे) आणि विकास कांबळे (वय २३ वर्षे) यांना ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींना २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे. याविषयीची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी पत्रकारांना दिली.