१ लाख युवकांना रोजगार देण्यासाठी राज्यशासनाचे विविध आस्थापनांसमवेत सामंजस्य करार !
मुंबई – कौशल्य विभागाच्या पुढाकाराने राज्यातील १ लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासनाने विविध आस्थापनांसमवेत सामंजस्य करार केले आहेत. १६ नोव्हेंबर या दिवशी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास अन् रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.