चरस विक्रीप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथील २ पोलिसांना अटक !
ठाणे, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथील पोलीस हवालदार महेश वसेकर आणि पोलीस शिपाई रवी विशे यांना चरसविक्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हाही नोंद झाला आहे. दुर्गाडी गडाच्या परिसरात चरस विक्री करतांना ठाणे शहर गुन्हे शाखा आणि अमलीपदार्थ विरोधी पथकाने १५ नोव्हेंबर या दिवशी ही कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे २ लाख रुपये किंमतीचे ९२१ ग्रॅम वजनाचे चरस जप्त करण्यात आले आहे, तर अन्य संशयित रेल्वे पोलिसांची चौकशी चालू आहे. (गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले असे पोलीस गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करतील का ? – संपादक)