‘मुळामुठा नदी सुधार प्रकल्पा’चे काम अभियंत्यांच्या स्थानांतरामुळे रखडले !
पुणे – शहरातील नदी स्वच्छ करण्यासाठी आणि मैलापाण्याची समस्या सोडवण्यासाठी ‘मुळामुठा नदी सुधार प्रकल्पा’चे (जायका प्रकल्प) काम ६ वर्षांनी चालू झाले आहे; परंतु प्रकल्पासाठी सिद्ध केलेल्या कक्षातील अभियंत्यांचे स्थानांतर झाल्यावर तेथे नवे अधिकारी नियुक्त केले नाहीत. त्यामुळे प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने होत आहे.
‘प्रकल्प अंमलबजावणी कक्षा’त ३३ अधिकार्यांचा समावेश असून तो पूर्ण होईपर्यंत एकाही अधिकार्यांचे स्थानांतर करू नये. अपवादात्मक स्थितीमध्ये स्थानांतर केल्यास आयुक्तांची मान्यता घ्यावी’, असे आदेश २५ मार्च २०२२ या दिवशी आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले होते; परंतु प्रशासनाने काही अधिकार्यांचे परस्पर स्थानांतर केले आहे.