शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राहुल गांधीच्या प्रतिकात्मक ‘पोस्टर’ला ‘जोडे मारा’ आंदोलन !
कोल्हापूर – स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील टीकेच्या विरोधात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक ‘पोस्टर’ला १७ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराज चौक ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणार्या राहुल गांधीचा धिक्कार असो’, अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून गेला. या वेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, शहरप्रमुख रणजीत जाधव, राहुल चव्हाण, शिवाजी जाधव, जयवंत हारुगले, महिलाआघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, श्रीमती पूजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, पूजा कामत यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
ठाणे येथे शिंदे गटाच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चपला मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. या वेळी आमदार प्रताप सरनाईक, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.