श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पुण्यात आक्रोश सभा
पुणे – देहलीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून पुण्यातील कोथरूडच्या करिष्मा चौकामध्ये १६ नोव्हेंबर या दिवशी आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नागरिक सहभागी झाले होते. ‘याला ‘लव्ह’ म्हणता येत नाही, तो ‘लव्ह जिहादच’ आहे. लव्ह जिहादने श्रद्धाचा बळी घेतला असून आज जे देहलीत घडले, ते उद्या पुण्यातही घडू शकते. हा प्रकार हिंदुविरोधी असून त्यासाठी ही आक्रोश सभा आयोजित केली आहे’, असे आयोजकांनी सांगितले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घोषणा देत आरोपी आफताबला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
नराधम आफताबला लवकरात लवकर फाशी द्या – राज्य महिला आयोग
या हत्याकांडाची गंभीर नोंद घेण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने केली आहे. ‘नराधम आफताबला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी’, अशी मागणी आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली. यासंबंधीचे पत्र महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाकडे पाठवले आहे.
चाकणकर म्हणाल्या, ‘‘श्रद्धा वालकर हिच्या संदर्भातील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. बेपत्ता असल्याच्या तक्रारीनंतर या प्रकरणी मुंबई आणि देहली पोलिसांनी लगेच कारवाई केल्याने ५ मासांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा छडा लागला. आता आरोपीच्या विरोधात ठोस पुरावे आणि सशक्त दोषारोपपत्र लवकर प्रविष्ट करण्याचे मोठे आव्हान आहे. या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हायला हवी. या प्रकरणाचे अन्वेषण जलद होऊन जलदगती न्यायालयात हा खटला चालावा, यासाठी राज्य महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाकडे पत्रव्यवहार केला आहे. यापुढेही राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल.’’
संपादकीय भूमिकायासह वासनांध नराधमांना कठोर शिक्षा होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी सरकारवर वैध मार्गांनी दबाव आणला पाहिजे ! |