ब्रिटनने जगातील धोकादायक देशांच्या सूचीतून पाकचे नाव हटवले !
लंडन (ब्रिटन)- ब्रिटन सरकारने पाकिस्तानला जगातील धोकादायक देशांच्या सूचीतून काढले आहे. नुकतेच ‘फायनेंशियल ॲक्शन टास्क फोर्स (एफ्.ए.टी.एफ्.)’ या संस्थेने पाकला करड्या सूचीतून बाहेर काढल्यामुळे ब्रिटनने हा निर्णय घेतला आहे. (ब्रिटनला धोकादायक कोण, हे कळत नाही का ? जगातील जिहादी आतंकवादी कारवायांमध्ये पाकचा कोणत्या ना कोणत्या कारणाने सहभाग असतो, हे आतापर्यंत उघड झाले आहे. – संपादक) आता या सूचीमध्ये २६ देशांचा समावेश आहे. यात सीरिया, इराण, म्यानमार आदी देशांचा समावेश आहे.