पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील पाणीपुरवठा विस्कळीत !
पुणे – गेल्या ४ दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमधील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांची असुविधा झाली आहे. काही दिवसांपासून शहरातील कोणत्या ना कोणत्या भागात पाण्याची तीव्र समस्या भेडसावत आहे. पाणीपुरवठा विभागाचा नियोजनशून्य कारभार या परिस्थितीला उत्तरदायी असल्याची तक्रार नागरिक, तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात येत आहे. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख श्रीकांत सवणे म्हणाले की, शहराच्या लोकसंख्यावाढीचा दर आणि भविष्यातील लोकसंख्या विचारात घेता नियमित अन् उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.