कुर्ला (मुंबई) येथे शमीम खान याने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार !
मुंबई – येथील कुर्ला येथे शमीम शान याने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार मुलीचे वडील राजेश लोंढे यांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुरवणी गुन्हा नोंद करतांना त्यात शमीम खान आणि त्याला सहकार्य करणार्या त्याच्या मुसलमान मित्रांची नावे समाविष्ट करण्यासाठी लोंढे यांनी पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे.
‘७ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी शिकवणीवर्गासाठी बाहेर पडलेली मुलगी पुन्हा घरी आली नाही’, असे लोंढे यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. गोवंडी येथील कापडाचे दुकान असलेल्या शमीम खान याने मुलीला पळवून नेल्याचा, तसेच हिंदु आणि मुसलमानेतर अन्य धर्मीय युवतींना पळवून नेणारी टोळी या भागात कार्यरत असल्याचा गंभीर आरोप लोंढे कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी या दृष्टीने अन्वेषण करण्याची विनंती लोंढे कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकामुसलमान दिवसाढवळ्या हिंदु मुलींना पळवून नेतात, हे कायदा-सुव्यवस्था नसल्याचे दर्शवते ! |