परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दोन्ही हातांच्या तळव्यांच्या संदर्भात झालेल्या दैवी पालटांमागील अध्यात्मशास्त्र !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये श्रीविष्णूचे तत्त्व कार्यानुमेय कार्यरत झाल्यामुळे त्यांच्या देहामध्ये विविध प्रकारचे दैवी पालट स्थुलातून होतात. या दैवी पालटांमागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये विविध प्रकारचे दैवी पालट होण्यामागील अध्यात्मशास्त्र !
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दोन्ही हातांच्या पंजांचा रंग गुलाबी होण्यामागील कार्यकारणभाव : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून साधकांच्या दिशेने प्रीती आणि त्यांच्या रक्षणासाठी तारक शक्ती यांचे प्रक्षेपण होते. प्रीती आणि तारक शक्ती यांच्या लहरींचा सूक्ष्म रंग गुलाबी असल्यामुळे त्यांच्या हातांच्या पंजांचा रंग गुलाबी झालेला आहे.
१ आ. पूर्ण पंजाच्या तुलनेत बोटांची टोके अधिक गुलाबी होण्यामागील कार्यकारणभाव : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील प्रीती जागृत झाल्यावर प्रीती सदृश्य गुलाबी रंगाच्या लहरींचे त्यांच्या पंजाच्या ठिकाणी घनीकरण होते आणि या लहरी त्यांच्या हाताच्या बोटांमध्ये कार्यरत होऊन त्यांच्या बोटांच्या टोकातून वातावरणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पूर्ण पंजाच्या तुलनेत त्यांच्या बोटांची टोके अधिक गुलाबी झालेली आहेत.
१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हातांच्या तळव्यांवर गुलाबी ठिपके येण्यामागील कार्यकारणभाव : परात्पर गुरु डॉ. आठवले हे मोक्षगुरु असून त्यांच्याकडून सतत प्रीतीच्या लहरींचे वायुमंडलात प्रक्षेपण होत असते. जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले लहान मुलांना भेटतात, तेव्हा ते त्यांना प्रेमाने जवळ घेतात. तेव्हा त्यांचे हात आणि तोंडवळा यांतून पुष्कळ प्रमाणात प्रीतीच्या लहरींचे प्रक्षेपण होत असते. त्याचप्रमाणे जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले जेव्हा शिवात्मा-शिवदशेत असतात, तेव्हा त्यांना जगभरातील भावपूर्णरित्या आणि श्रद्धेने धर्माचरण अन् साधना करणार्या सात्त्विक जिवांप्रती पुष्कळ प्रमाणात वात्सल्य दाटून येते. त्यामुळे जगभरातील कर्महिंदूंवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रीतीमय कृपेचा वर्षाव अखंड चालू असतो. तेव्हा या प्रीतीमय लहरींचे घनीकरण त्यांच्या हातांच्या तळव्यांवर होऊन त्यांवर गुलाबी रंगाचे ठिपके येतात. यावरून ‘आपली गुरुमाऊली किती वात्सल्यमय आहे’, याची आपल्याला प्रचीती येते.
१ उ. बोटांच्या पेरांवर पिवळट, तर काही ठिकाणी निळसर रंगाची छटा दिसण्यामागील कार्यकारणभाव : परात्पर गुरु डॉ. आठवले जेव्हा ज्ञानगुरु म्हणून कार्यरत असतात, तेव्हा त्यांच्याकडून जेव्हा ज्ञानशक्ती आणि ईश्वरी चैतन्य प्रक्षेपित होते, तेव्हा त्यांच्या बोटांच्या पेरांवर ज्ञान अन् चैतन्य या लहरींची पिवळर रंगाची छटा दिसते. जेव्हा विश्वातील साधक विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भक्तीभावाने आळवतात किंवा आत्मनिवेदन करतात, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात श्रीविष्णुतत्त्व प्रगट होऊन ‘भक्तवत्सल’ रूपात कार्यरत होते. तेव्हा त्यांच्या देहातून विष्णूतत्त्वाच्या कृपामय तत्त्वलहरी संपूर्ण वायुमंडलात प्रक्षेपित होऊन संपूर्ण वायुमंडलाची शुद्धी होते. विष्णुतत्त्वाचा रंग निळसर असल्यामुळे जेव्हा त्यांच्या देहातून विष्णुतत्त्व प्रक्षेपित होते, तेव्हा त्यांच्या बोटांच्या पेरांवर निळसर रंगाची छटा दिसते.
१ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हातांच्या बोटांवर काळे डाग उमटण्यामागील कार्यकारणभाव : परात्पर गुरु डॉ. आठवले हे समष्टी किंवा विश्वगुरु आहेत. त्यामुळे जेव्हा पाताळातील वाईट शक्ती सनातनच्या साधकांवर सूक्ष्मातून आक्रमणे करतात, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांवरील सूक्ष्मातील आक्रमणे स्वत: झेलतात. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या अवतारी मारक शक्तीमुळे त्यांच्याकडे आकृष्ट झालेली ९९ टक्के वाईट शक्ती नष्ट होते. केवळ १ टक्का वाईट शक्ती त्यांच्या देहामध्ये शोषली गेल्यामुळे वाईट शक्तीचे प्रतीक असलेले काळे डाग त्यांच्या हातांच्या बोटांवर उमटतात.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तळहातांवर येणार्या छटा, त्यांमध्ये कार्यरत घटक आणि संबंधित दैवी रूप
सारांश
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये जे रूप कार्यरत असते, त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये विविध घटक कार्यरत होतात. जेव्हा हे घटक वातावरणात प्रक्षेपित होतात, तेव्हा त्यांच्या हातांच्या बोटांवर विविध रंगांच्या छटा उमटतात. यावरून आध्यात्मिक अवस्थेनुसार ज्याप्रमाणे आध्यात्मिक उन्नतांमध्ये संबंधित तत्त्व कार्यरत होते, तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्या स्थूल देहावर होऊन त्यामध्ये दैवी पालट होतात, हे सूत्र शिकायला मिळाले.
कृतज्ञता : श्रीगुरूंच्या कृपेमुळेच त्यांच्या तळहाताच्या संदर्भात घडलेल्या दैवी पालटांमागील अध्यात्मशास्त्र उमजले, यासाठी मी श्रीगुरुचरणी अनन्यभावाने कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. |