धर्मांतराला आळा घातला नाही, तर परिस्थिती भीषण होईल ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
मेरठ (उत्तरप्रदेश) – मुसलमानांची वेशभूषा पाहून भीती वाटते. देशात धर्मांतराला आळा घातला नाही, तर परिस्थिती भीषण होईल, असे परखड मत बद्रीनाथ येथील ज्योतिष पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी व्यक्त केले आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे पीठाच्या गादीवर विराजमान झाल्यानंतर प्रथमच मेरठला गेले. या वेळी ‘दिव्य मराठी’ वत्तसंकेतस्थळाच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. त्या वेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितलेली सूत्रे
१. धर्मांतरामुळे देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती सर्वांसमोर आहे. यावर सरकार आणि न्यायालये विचार करत आहेत, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने याची स्वत:हून नोंद घेऊन याविषयी सुधारणा करण्याचे निर्देश द्यावेत, अन्यथा देशाची परिस्थिती कोणत्या दिशेने जात आहे, हे आपण पहात आहोत. हे सर्वांसाठीच चिंताजनक आहे.
२. मदरशांचे सर्वेक्षण करावे लागेल. मदरशांमध्ये घडणार्या घटना प्रत्येकाला कळल्या पाहिजेत. ‘किती मदरसे आहेत ?’, ‘त्यांच्यामध्ये काय घडत आहे ?’, सर्व काही सरकारला ठाऊक असले पाहिजे.
३. मुसलमानांच्या वेशभूषेमुळे लोक त्यांना घाबरत आहेत. जर एखादा मुसलमान त्यांचा पोशाख घालून इतर देशांत गेला, तर त्याची तपासणी अधिक केली जाते; कारण त्यांच्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. त्यांच्या समाजातील लोकांनी काहीतरी केले आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी प्रतिमा निर्माण झाली आहे.