साधनेची दृष्टी आणि विचारांत प्रगल्भता असणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. शर्वरी हेमंत कानस्कर (वय १५ वर्षे) !
‘मला शाळेतील अभ्यासात रुची वाटत नाही; कारण मला शैक्षणिक पदवी घेण्यापेक्षा साधनेतील उच्च स्तर गाठायचा आहे. त्यामुळे मला शाळेतील वह्या किंवा पुस्तके वाचण्यापेक्षा अध्यात्म आणि साधना यांचे अमूल्य ज्ञान देणर्या सात्त्विक ग्रंथांचे वाचन करणे अधिक योग्य वाटते. याविषयी नातेवाईक किंवा इतरांचा दृष्टीकोन ‘शिक्षण पूर्ण करावे’, असा असतो; पण ‘इतरांना काय वाटेल ?’, याचा मी विचार केल्यास माझ्या मनुष्यजन्माचे सार्थक होऊ शकणार नाही; कारण मला देवाला अपेक्षित असे घडायचे आहे ! ‘माझ्या प्रारब्धात काय आहे ?’, हे इतरांना ठाऊक नसून केवळ देवालाच ठाऊक आहे’, असे मला वाटते.’
‘हे गुरुदेवा, सर्वांनाच साधनेचे महत्त्व कळत नाही; परंतु आपणच माझ्या मनात साधनेचे महत्त्व रुजवलेत. हे गुरुनाथा, ही केवळ आणि केवळ आपलीच कृपा आहे. हे माझे विचार नसून आपणच सुचवलेले अनमोल ज्ञानामृत आहे. मला सदैव आपल्या चरणांशी ठेवा’, अशी मी प्रार्थना करून कृतज्ञता व्यक्त करते.’
– गुरुदेवांची,
कु. शर्वरी कानस्कर (वय १५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), फोंडा, गोवा. (१३.६.२०२२)