रायगडमध्ये रासायनिक वायूगळतीत एकाचा मृत्यू
रायगड – महाड एम्.आय.डी.सी.मधील प्रसोल रासायनिक आस्थापनामध्ये वायूगळती झाल्याने एका कर्मचार्याचा मृत्यू झाला आहे, तर दोन कर्मचार्यांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना १४ नोव्हेंबर या दिवशी घडली. जितेंद्र आडे असे मृत कामगाराचे नाव असून प्रशांत किंकले आणि मिलिंद मोरे हे कर्मचारी गंभीर घायाळ झाले आहेत.