मुख्य सूत्रधाराला मुंब्रा येथून अटक !
गायी-म्हशींच्या दूधवाढीसाठी अवैध ‘ऑक्सिटॉसीन’ औषधांचे विक्री प्रकरण
पुणे – गायी-म्हशींचे दूध वाढवण्यासाठी अवैधपणे ऑक्सिटॉसीन औषधाची विक्री करणार्या बंगालमधील टोळीचा मुख्य सूत्रधार बाबूभाई उपाख्य अल्लाउद्दीन लस्कर याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ठाण्यातील मुंब्रा परिसरातून अटक केली आहे. बंगालमधील या टोळीला अमली पदार्थविरोधी पथक, विमानतळ पोलीस ठाणे, तसेच अन्न आणि ओैषध प्रशासन विभाग (एफ्.डी.ए.) यांनी पकडले होते. लोहगावमधील कलवड वस्ती परिसरात आरोपी ऑक्सिटॉसीन ओैषधाची निर्मिती करत होते.
या प्रकरणी समीर कुरेशी याच्यासहित ४ जणांना अटक करण्यात आली होती. आरोपी समीर कुरेशीने साथीदारांशी संगनमत करून या औषधांचा साठा करून ठेवल्याचे अन्वेषणात उघडकीस आले होते.