त्र्यंबकेश्वर मंदिरातील देणगी दर्शन ऐच्छिक ! – उच्च न्यायालय
नाशिक – जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरातील देणगी दर्शनाविषयी देवस्थानद्वारे कुठलीही बळजोरी केली जात नसून भक्तांसाठी हा विषय ऐच्छिक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीच्या वेळी सांगितले. या खटल्याची पुढील सुनावणी ३० नोव्हेंबरला होणार आहे.
पुढील सुनावणी 30 नोव्हेंबर राेजी:त्र्यंबकेश्वर मंदिरातील देणगी दर्शन ऐच्छिक : उच्च न्यायालय#nashik #trimbakeshwar #temple #highcourt #donation https://t.co/y0ev9dGl7f
— Divya Marathi (@MarathiDivya) November 15, 2022
‘त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची सदैव गर्दी असते. लवकर दर्शन मिळण्यासाठी अनेक जण प्रती व्यक्ती २०० रुपये देणगी देऊन दर्शन घेतात. त्यामुळे इतर भाविकांवर अन्याय होतो’, असा दावा देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी याविषयी मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या एका याचिकेत केला होता. यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने याविषयी याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा दिला नाही. ‘त्र्यंबकेश्वर मंदिर हे पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असून सर्वस्वी निर्णय त्यांचे असतात. विश्वस्त मंडळाला असे निर्णय घेता येत नाहीत. हा इतर सर्वसामान्य भाविकांवर अन्याय आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे.
संपादकीय भूमिका
|