संभल (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !
मुसलमानबहुल गावात विद्यार्थिनींच्या छेडछाडीला विरोध केल्याचा परिणाम !
संभल (उत्तरप्रदेश) – येथील मुसलमानबहुल मझावली गावातील शाळेजवळ विद्यार्थिनींच्या छेडछाडीला हिंदु तरुणाने विरोध केल्याने मुसलमानांकडून दगडफेक करण्यात आली. यानंतर दोन्ही धर्मियांमध्ये हिंसाचार झाला. या वेळी गोळीबार करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी अक्रम, रिहान, शेर महंमद, साजिद, मेहरबान, अस्लम, शानू, शाहनवाज, नदीम, निझामुद्दीन, शमशाद, मुसब्बर आणि महंमद झैद यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून यांतील ६ जणांना अटक केली आहे. या हिंसाचारात विशाल, विवेक, घनश्याम, अंशु, किशनवती आणि इंद्रवती हे घायाळ झाले आहेत.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असल्यामुळे तेथे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, असे हिंदूंना वाटते ! |