कर्नाटकमध्ये बांधलेल्या ७ सहस्र ५०० नवीनवर्गखोल्यांना भगवा रंग देणार ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री
बेंगळुरू – कर्नाटक सरकार शाळांमध्ये ‘विवेक’ योजनेच्या अंतर्गत ७ सहस्र ५०० नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करत आहे. या खोल्या भगव्या रंगाने रंगवल्या जाणार असून भगव्या रंगाची निवड वास्तूविशारदांच्या सल्ल्यानुसार करण्यात आली आहे, अशी माहिती कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी नुकतीच दिली. उत्तर कर्नाटकातील गडग जिल्ह्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. नागेश यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्षाने भाजपवर टीका केली आहे. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना शिक्षणतज्ञ निरंजनाराध्या व्ही.पी. यांनी याला शिक्षणाच्या भगवेकरणाचा नवा प्रकार असल्याचे म्हटले आहे.
भगवा रंग पाहून काँग्रेस इतकी दु:खी का होते ? – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, ‘‘अशा सूत्रांवर राजकारण करणे योग्य नाही. आपल्या राष्ट्रध्वजाचा रंग भगवा आहे. भगवा रंग पाहून काँग्रेस इतकी दु:खी का होते ? ‘आम्ही वर्गखोल्या बांधून त्या स्वामी विवेकानंदांना समर्पित करत आहोत. ते भगवे धारण केलेले संत होते.’’
संपादकीय भूमिकाम्हैसुरू येथील मशिदीच्या आकारातील बसस्थानकाविषयी चकार शब्दही न काढणार्यांना आता कंठ फुटल्यास आश्चर्य वाटू नये ! |