जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाच्या आरोपावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद पेटला !
मुंबई – भाजपच्या महिला मोर्चाच्या महामंत्री रिदा रशीद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरून आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्यामुळे राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये वाद पेटला आहे. ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून आव्हाड यांना पाठिंबा दर्शवला.
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आव्हाड यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी ‘याला विनयभंग’ म्हणतात का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. आमदार जयंत पाटील यांनीही आव्हाड यांची बाजू घेत भाजपवर टीका केली आहे. भाजपकडून आशिष शेलार तसेच अन्य नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.