हिंदु जनजागृती समितीच्या ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ या अभियानाला नगर जिल्ह्यातील धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर – त्रिपुरारि पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ हे अभियान राबवण्यात आले. या अंतर्गत नगर जिल्ह्यात २२ हून अधिक मंदिरांमध्ये दीपोत्सव, तसेच ठिकठिकाणच्या मारुति मंदिरांमध्ये शेंदूर भोग अर्पण करण्याचा उपक्रम करण्यात आला.
या अभियानाला नगर शहर, नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा इत्यादी तालुक्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी उपस्थितांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी दीप लावून प्रार्थना केली.
समितीच्या ‘मंदिर संस्कृती रक्षण अभियाना’च्या अंतर्गत नगर जिल्ह्यात प्रत्येक पौर्णिमेला श्री मारुतिरायाला शेंदूर भोग अर्पण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ नेवासा येथून करण्यात आला. याचसमवेत नगर शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला. शेंदूर लेपनानंतर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा करून आरती करण्यात आली.