नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन !
नवी मुंबई – २६ नोव्हेंबर या दिवशी संविधान दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधानाविषयी विद्यार्थी आणि नागरिक यांच्यामध्ये जागृती व्हावी, यासाठी निबंध, वक्तृत्व आणि घोषवाक्य या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भारतीय संविधानाचे महत्त्व’, ‘माझे संविधान’, ‘माझा अभिमान आणि संविधान निर्मिती’, तसेच ‘बाबासाहेब’ या विषयांवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धांविषयी अधिक माहितीसाठी शालेय विद्यार्थ्यांनी खुशाल चौधरी यांच्याशी ९८६७९२२४१५ या क्रमांकावर संपर्क साधावा. महाविद्यालयीन आणि खुल्या गटांसाठी ‘निबंध अन् घोषवाक्य’ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी समाजविकास विभागाचे दशरथ गंभिरे यांच्याशी ९७०२३०९०५४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.