महिलेचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणून धर्मांध कुटुंब पसार !
मृत्यू संशयास्पद असून सासरच्या लोकांना अटक करण्याची मृत महिलेच्या आई-वडिलांची मागणी
सोलापूर – शहरातील लष्कर परिसरातील फलटण मशिदीजवळ रहाणार्या एका २१ वर्षीय मिजबा कुरेशी या विवाहितेचा मृत्यू झाला आहे. मिजबा कुरेशी हिच्या सासरच्या मंडळींनी मृतदेह शासकीय रुग्णालयामध्ये आणून ते सर्व पसार झाले आहेत. मृत्यूची माहिती समजताच मृत मिजबा कुरेशीच्या माहेरच्या नातेवाइकांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. ‘हा मृत्यू संशयास्पद असून मृत महिलेचे पती, सासू, नणंद यांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह कह्यात घेणार नाही’, अशी चेतावणी महिलेच्या आई-वडिलांनी दिली.
मृत महिलेचा येथील शाहिद कुरेशी समवेत ६ मासांपूर्वी विवाह झाला होता. विवाहाच्या वेळी ५ लाख रुपये देऊनही सासरच्या लोकांकडून पुन्हा १० लाख रुपयांची मागणी केली जात होती. पती शाहीद कुरेशी तिला सतत मारहाण करत होता, असे आरोप मृत महिलेच्या आईने केले आहेत.