श्रीमती मंदाकिनी विनायकराव चौधरी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८५ वर्षे) यांच्याविषयी साधकाला जाणवलेली सूत्रे
१. ‘धाराशिव येथील श्रीमती मंदाकिनी चौधरी (पू. (सौ.) संगीता जाधवकाकू यांच्या आई) रामनाथी आश्रमात आल्या होत्या. मी त्यांना प्रथम पाहिले, तेव्हा मला ‘त्या भगवंताच्या अनुसंधानात असून त्यांची दृष्टी शून्यात स्थिरावली आहे’, असे मला जाणवले.
२. मी आश्रमातील भोजनकक्षामध्ये बसलो होतो. त्या माझ्या समोरून भोजनकक्षात जात असतांना मला ‘सकाळपासून माझ्या शरिरामध्ये जाणवत असलेले जडत्व अल्प होऊन माझे शरीर हलके झाले आहे’, असे मला जाणवले.’
– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१२.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |