तेलंगाणातील आमदार खरेदी प्रकरणी ३ जणांना अटक
भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणातील सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समितीच्या ४ आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणी सरकारने विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. या पथकाने या प्रकरणी तेलंगाणासह केरळ, कर्नाटक आणि हरियाणा राज्यांतील ७ ठिकाणी या धाडी घातल्या गेल्या.
100 करोड़ में विधायकों की खरीद-फरोख्त, तेलंगाना पुलिस का 4 राज्यों में छापाhttps://t.co/LXNvxGdLE9देश/100-करोड़-में-विधायकों-की-खरीद/@AbsoluteIndNews @sanjaypchauhan @BJP4India @SadhnaShivraj @ricardoNOmesqui @MamataOfficial @akshay0190 @RajaSehkar8 #OmRaut pic.twitter.com/yv2GdGqBBG
— Absolute India News (@AbsoluteIndNews) November 13, 2022
या प्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात फरीदाबाद (हरियाणा) येथील धर्मगुरु रामचंद्र भारती, भाग्यनगरमधील व्यापारी नंद कुमार आणि तिरुपती येथील सिम्हयाजी स्वामी यांचा समावेश आहे. यासह केरळच्या कोच्चि येथील डॉ. जग्गू यांच्या घराची झडती घेण्यात आली.