ठाणे येथे बनावट नोटा चलनात आणणार्या दोघांना अटक !
ठाणे, १३ नोव्हेंबर (वार्ता.) – बनावट नोटा चलनात आणणारे राम शर्मा आणि राजेंद्र राऊत यांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ कोटी रुपयांच्या बनावट भारतीय नोटा जप्त केल्या आहेत.
(सौजन्य : ABP MAJHA)
आरोपींनी २ सहस्र रुपयांच्या बनावट भारतीय नोटा छापल्या असून आरोपींकडून ४०० बंडले जप्त केली आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्यांना कठोर शिक्षा करावी ! – संपादक)