गायरान भूमीवरील अतिक्रमणे काढून घ्यावीत ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली
सांगली – जिल्ह्यात गायरान भूमीवर निवासी, वाणिज्य, औद्योगिक शेती, तसेच अन्य प्रयोजनार्थ नागरिकांनी अतिक्रमणे केली आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान भूमीवरील अतिक्रमणे ३१ डिसेंबरपूर्वी काढून टाकायची आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील ६ मासांहून अधिक काळापासून अस्तित्वात असलेली अतिक्रमणे १० दिवसांच्या आत काढून घ्यावीत; अन्यथा ती काढून टाकण्यात येतील. त्यासाठीचा व्यय संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.
(सौजन्य : Prabhudeva GR & sheti yojana)
अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ५३ (२) नुसार पंचायतीला असा कोणताही अडथळा किंवा अतिक्रमण काढून टाकण्याचा आणि खासगी मालमत्ता नसलेल्या कोणत्याही गायरानावर किंवा इतर भूमीवर अनधिकृतपणे लागवड केलेले पीक काढून टाकण्याचा अधिकार आहे. तरी अतिक्रमण काढून टाकण्याच्या कारवाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी समिती घोषित करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.