जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतांना हलाल प्रमाणपत्र नसलेल्या वस्तूंसाठी आग्रह धरा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
|
फोंडा (गोवा) – समांतर अशी हलाल अर्थव्यवस्था निर्माण करून राष्ट्राच्या आंतरिक सुरक्षेला धोका निर्माण केला जात आहे. हिंदूंचा व्यापार आणि व्यवसाय यांमध्ये हस्तक्षेप करून हलाल अर्थव्यवस्था उभी करणे, हे एक जागतिक षड्यंत्र आहे. हे षड्यंत्र मोडून काढण्यासाठी सर्वांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतांना हलाल प्रमाणपत्र नसलेल्या वस्तूंसाठी आग्रह धरला पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्ती अभियानाच्या निमित्ताने दीनदयाळ सभागृह डिचोली; विश्व हिंदु परिषद सभागृह, खडपाबांध, फोंडा आणि ‘शिवस्मृती’ खेडेकर सभागृह, हरवळे, सांखळी येथे ‘हलाल जिहाद’ या विषयावर विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये श्री. शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
क्षणचित्र : फोंडा, डिचोली आणि हरवळे येथे व्याख्यानानंतर आयोजित केलेल्या बैठकीमध्ये हलालविरोधी कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
अभिप्राय
१. श्री. रामदास भगत, पत्रकार, आमोणा, सांखळी – ‘हलाल जिहाद’ हा विषय गंभीर आहे आणि प्रत्येकाने हलाल प्रमाणित वस्तू घेण्याचे टाळावे. हा प्रकार बंद करण्यासाठी शासनाकडेही आग्रह धरला पाहिजे.
२. श्री. मंदार गावडे, डिचोली – ‘देव, देश आणि धर्म यांप्रती हिंदु समाज कसा जागृत राहील ?’, याविषयी समितीचे प्रयत्न अप्रतिम अन् अभिमानास्पद आहेत.
पणजी येथे हिंदू रक्षा महाआघाडीच्या वतीने ‘हलाल जिहाद’ विषयावर रमेश शिंदे यांचे व्याख्यान
पणजी – ‘हिंदू रक्षा महाआघाडी’च्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे पणजी येथे सिद्धार्थ बांदोडकर सभागृहात ‘हलाल जिहाद’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘हिंदू रक्षा महाआघाडी’चे समन्वयक श्री. संदीप पाळणी यांनी व्याख्यानाचा उद्देश सांगितला. या कार्यक्रमाला ‘भारतमाता की जय’ संघटनेचे कार्यवाह श्री. प्रवीण नेसवणकर, राष्ट्रीय बजरंग दलाचे अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई, ‘मातृशक्ती’ विभागाचे प्रमुख श्री. गणेश गावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. श्री. नितीन फळदेसाई यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पणजीतील अनेक व्यापारी आणि उद्योजक उपस्थित होते.