‘सापळा पीक’ म्हणजे काय ?
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘मुख्य पिकाची किडींपासून होणारी हानी अल्प व्हावी, यासाठी किडींना अधिक प्रमाणात बळी पडणारे जे दुसरे पीक मुख्य पिकासमवेत लावले जाते, त्याला ‘सापळा पीक’ म्हणतात. अशा प्रकारे लागवड केल्याने कीड दुसर्या पिकाकडे आकर्षित होते आणि मुख्य पिकाचे रक्षण होते. मोहरी आणि चवळी ही सापळा (Trap) पिकाची उदाहरणे आहेत. या सापळा पिकांवर ‘मावा’ ही कीड आकर्षित होते. या पिकांना कीड लागल्यावर या झाडांवर नैसर्गिक किटकनाशकाची फवारणी करावी किंवा ही झाडे काढून टाकावीत.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१४.१०.२०२२)