नागपूर अपहरण प्रकरणातील ३ पसार आरोपींना अटक !
नागपूर – कळमना येथील चिखली झोपडपट्टीतून १० नोव्हेंबरला ८ मासांच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. १२ नोव्हेंबरच्या रात्री या प्रकरणातील पसार आरोपी योगेंद्र प्रजापती आणि त्याची पत्नी रिटा प्रजापती यांना भोपाळ येथून रेल्वेने राजस्थानातील कोटा येथे पळून जात असतांना, तसेच श्वेता खान हिला राजस्थान येथून अटक करण्यात आली आहे. प्रजापती दांपत्य पळून जाण्याच्या सिद्धतेत होते. मध्यप्रदेश पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.