सीमा शुल्क न भरल्यामुळे शाहरुख खान यांना मुंबई विमानतळावर रोखले !
मुंबई – सीमा शुल्क न भरल्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शाहरुख खान यांना मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी रोखले. १ घंटा पडताळणी करून, तसेच सीमा शुल्काचे ६ लाख ८३ सहस्र रुपये घेतल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. शाहरुख खान एका कार्यक्रमासाठी दुबईत गेले होते. दुबईहून भारतात येतांना विमानतळावर शाहरुख खान यांच्याकडे महागडी घड्याळे होती. त्यांचे सीमा शुल्क भरलेले नसल्यामुळे त्यांना थांबवण्यात आले. सीमा शुल्क विभागाचे साहाय्यक आयुक्त युधवीर यादव यांनी ही कारवाई केली.
संपादकीय भूमिकाकर चुकवून राष्ट्रीय संपत्तीची हानी करणार्यांचा आदर्श तरुणाईने ठेवायचा का ? हे ठरवावे ! |