मुंबई विमानतळावर तस्करीचे ३२ कोटी रुपयांचे सोने पकडले !
मुंबई – मुंबई विमानतळावर २ वेगवेगळ्या कारवायांमध्ये तस्करी करण्यात येत असलेले ३२ कोटी रुपयांचे ६१ किलो सोने सीमा शुल्क विभागाने पकडले. या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई ११ नोव्हेंबर या दिवशी करण्यात आली.
‘युएई’ देशातून सोने आणणारे ३, तर दुबईहून सोने आणणार्या ४ जणांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये २ महिलांचाही समावेश आहे. पोलिसांनी न्यायालयात माहिती देतांना सांगितले की, आरोपींना भारतात सोने आणण्यासाठी आमीष दाखवण्यात आले होते. सोने तस्करी करणार्या काही लोकांची नावे आरोपींनी सांगितली असून याविषयी चौकशी चालू आहे.