कार्तिकी यात्रेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ३ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – नुकत्याच झालेल्या कार्तिकी यात्रेच्या कालावधीत येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला एकूण ३ कोटी २० लाख ५९ सहस्र ५४२ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ ३० टक्क्यांपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वर्षी २६ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०२२ असा कार्तिकी यात्रेचा कालावधी होता. मुख्य कार्तिकी एकादशीचा सोहळा ४ नोव्हेंबर या दिवशी झाला. गतवर्षी मंदिर समितीला कार्तिकी यात्रेमध्ये १ कोटी ९७ लाख ८३ सहस्र ५७ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्या तुलनेत या वर्षी १ कोटी २२ लाख ७६ सहस्र ४८५ रुपये उत्पन्नात वाढ झाली आहे.