अमरावती येथे खासगी रुग्णालयातून आरोपीचे पलायन
२ पोलीस कर्मचारी निलंबित, तर ठाणेदारांचे स्थलांतर !
अमरावती – प्राणघातक आक्रमणात गंभीर घायाळ झालेला आरोपी नितीन उपाख्य बबलू गाढे (वय ३६ वर्षे) याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. प्राणघातक आक्रमणाचा गुन्हा नोंद असल्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी २ पोलीस रुग्णालयात तैनात होते; मात्र ११ नोव्हेंबर या दिवशी आरोपीने रुग्णालयातून पलायन केले. या घटनेची गंभीर नोंद घेऊन या प्रकरणी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी १२ नोव्हेंबर या दिवशी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यातील पोलीस ठाणेदार अनिल कुरळकर यांचे तडकाफडकी विशेष शाखेला स्थानांतर केले असून २ पोलिसांना निलंबित केले आहे. पोलीस नाईक नईम बेग आणि संजय डेरे अशी त्यांची नावे आहेत.
संपादकीय भूमिकागुन्हेगारांवर लक्ष न ठेवणार्या कर्तव्यच्युत पोलिसांचे केवळ स्थानांतर करून त्यांच्या वृत्तीत काय फरक पडणार ? अन्य ठिकाणीही ते असे वर्तन करणार नाहीत कशावरून ? त्यामुळे अशांना बडतर्फच करायला हवे ! |