इंदापूर (पुणे) येथील वाढत्या गोहत्या रोखण्यासाठी गोरक्षकांचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन
पुणे, १३ नोव्हेंबर (वार्ता.) – इंदापूर येथील वाढत्या गोहत्या रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी सहकार्य करावे, अशा आशयाचे निवेदन गोरक्षक श्री. ऋषिकेश कामथे यांनी १२ नोव्हेंबर या दिवशी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिले आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, तसेच मुंबईचे पोलीस महासंचालक यांना देण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून मी आणि माझे गोरक्षक साथीदार पोलिसांच्या साहाय्याने इंदापूर येथील पशूवधगृहातील गोवंशीय जनावरांच्या कत्तली रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. आम्ही जेव्हा कारवाईसाठी इंदापूर येथे जातो, तेव्हा कुरेशी वस्तीतील कसाई समीर कुरेशी, झाकीर कुरेशी, रहिज कुरेशी, रहिज बेपारी, मुनीर बेपारी, शब्बीर कुरेशी आदी पोलिसांवरच दबाव आणून गोरक्षकांवर ॲट्रॉसिटी, चोरी, छेडछाड इत्यादी सारख्या गंभीर अपराधांचे आरोप लावण्यास भाग पाडत आहेत आणि उघडपणे गोहत्या करत आहेत. इंदापूरमधील पोलीस प्रशासन या वाढत्या गोहत्या रोखण्यात असमर्थ ठरत आहे, असे गोरक्षक श्री. ऋषिकेश कामथे यांचे म्हणणे आहे. (उद्दाम धर्मांधांवर पोलिसांचा वचक असणे आवश्यक आहे. पोलिसांवर धर्मांधांचा वचक असेल, तर हे पोलिसांसाठी लज्जास्पद नव्हे का ? – संपादक)
निवेदनात पुढे म्हटले आहे की, इंदापूर येथील गोमांस पुणे, सोलापूर, धाराशिव येथील मुसलमानबहुल क्षेत्रामध्ये पाठवले जात आहे. इंदापूर येथील कुरेशी वस्तीत पोलीस आणि गोरक्षक कारवाईसाठी जातात, तेव्हा तेथील मुसलमान समाजाकडून पोलिसांना शिवीगाळ करणे, त्रास देणे असे प्रकार घडत आहेत. (गोमातेसह तिचे रक्षण करणारे गोरक्षक संकटात, तर गोहत्या करणारे कसाई मोकाट असणे, हे लज्जास्पद आहे. कारवाया करूनही या आडदांड प्रवृत्तीच्या कसायांना काहीच फरक पडत नाही. त्यासाठी गोहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होणे आवश्यक आहे. – संपादक)
संपादकीय भूमिकाअसे निवेदन का द्यावे लागते ? गोवंश हत्याबंदी कायदा असतांना प्रशासन स्वतःहून पुढाकार का घेत नाही ? |